Sangli Rain | सांगलीत मुसळधार, दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली, कृष्णेची पाणी पातळी 23 फुटांवर
सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यासह सांगली सातारा जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे कृष्णा आणि पंचगंगा नदीला पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून संततधार पाऊस पडत असल्यामुळे पंचगंगा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढत आहे. सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे दोन बंधारे आणि एक पूल पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावाचा संपर्क तुटला आहे. तर सांगलीच्या कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. कृष्णा नदीची पाणी पातळी 23 फुटांवर गेली आहे. तर जिल्ह्यात पावसाची संथदार सुरूच आहे. त्यामुळे प्रशासनाणे आपत्कालीन यंत्रणा सज्ज केली आहे. नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. | sangli rain update heavy rain krushna river water level increases