Sangli | सरकारने आमचे पुनर्वसन कायमचे करावे, नागरिकांची सरकारकडे मागणी

| Updated on: Jul 29, 2021 | 2:29 PM

हातावर पोट भरण्यासाठी राहत असलेल्या या गोरगरीब लोकांच्या घरात महापूर आल्यानंतर पाणी शिरले आणि 150 कुटुंबातील लोकांचा संसार उध्वस्त झाला.

कृष्णा नदीला महा पूर आला आणि त्यामुळे सांगली जिल्ह्यातील अनेक घरात पाणी शिरले होते. वाळवा गावातील वडर, कैकाडी आणि इतर समाज बांधव हे पेटभाग येथे राहत होते. हातावर पोट भरण्यासाठी राहत असलेल्या या गोरगरीब लोकांच्या घरात महापूर आल्यानंतर पाणी शिरले आणि 150 कुटुंबातील लोकांचा संसार उध्वस्त झाला. कृष्णा नदीचे पाणी या 150 कुटूंबाच्या घरात शिरल्यामुळे या सर्वांना आहे तसे घर संसार सोडून निवारा केंद्रात राहावे लागले. सरकारची आतापर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, मात्र सरकारने आमचे कायमचे पुनर्वसन करावे अशी मागणी या वडर कुटुंबातील सदस्यांनी केली आहे.
Ajit Pawar UNCUT | महाराष्ट्रात पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता – अजित पवार
Mumbai Local Train | कोरोना लस घेतलेल्यांना लोकल प्रवासाची परवानगी द्या, नेत्यांची सरकारकडे मागणी