‘आम्ही फोन करत नाही, पवार गटाकडून अजितदादांना मिसकॉल येतात’, राष्ट्रवादीच्या आमदाराचा गौप्यस्फोट
बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत चला, दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना हा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदारांना संपर्क केल्याची चर्चा आहे. बाप-लेकीला सोडून अजित पवार यांच्यासोबत चला, अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शरद पवार गटाच्या खासदारांना असा प्रस्ताव होता, अशी सूत्रांकडून माहिती मिळत आहे. दिल्लीमध्ये संसदेचं हिवाळी अधिवेशनाच्या वेळी सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या खासदारांना हा प्रस्ताव दिला असल्याची माहिती मिळतेय. दरम्यान, अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही फोन करत नाही तर त्यांचे मिसकॉल अजित पवारांना येत आहे आणि त्यामुळे पक्षाची ताकद वाढविण्यासाठी आम्ही येणाऱ्या लोकांचे स्वागत करू. फक्त खासदारचं नाही तर आमदार देखील घड्याळ तेच मात्र वेळ नवीन पाहणार या दृष्टीकोनातून यश पाहायला मिळणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. पुढे ते असेही म्हणाले की, अजित पवार यांचं नेतृत्व हे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरही मान्य झालं आहे. त्यामुळे ज्या निवडणुका महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर होतील त्यामध्ये राष्ट्रवादीचा नेता त्या ठिकाणी जाईल आणि जिंकण्याचा प्रयत्न करेल, असं नियोजन सुरू असल्याचेही त्यांनी म्हटलं आहे.