शिंदे गटाची उमेदवारी उद्या जाहीर होणार; शिवसेनेच्या नेत्याची माहिती, हे आहेत संभाव्य उमेदवार
शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी यादी उद्या जाहीर होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी दिली आहे. 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि माझा फोन झाला...', बघा नेमकं काय झालं मुख्यमंत्री शिंदे आणि मंडलिक यांच्यात बोलणं
शिंदे गटाची लोकसभा निवडणुकीची उमेदवारी यादी उद्या जाहीर होणार आहे, अशी माहिती शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी दिली आहे. ‘मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणि माझा फोन झाला. तुमच्या सगळ्यांच्या लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारी ठरली आहे. तुम्ही काम सुरू ठेवा, अशा सूचना त्यांनी दिल्यात.’, असं शिंदे गटाचे नेते संजय मंडलिक यांनी सांगितले. दरम्यान, शिवसेनेच्या संभाव्य उमेदवार यांच्या नावांची चर्चा होत आहे. त्यामध्ये रामटेकचे राजू पारवे, वाशिम-यवतमाळचे संजय राठोड, ठाण्यातून प्रताप सरनाईक, कल्याण-डोबिंवलीतून श्रीकांत शिंदे, दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, मावळमधून श्रीरंग बारणे, कोल्हापूरमधून संजय मंडलिक, हातकणंगले येथून धैर्यशील माने, बुलढाण्यातून प्रतापराव जाधव आणि शिर्डीमधून सदाशिव लोखंडे हे उमेदवार संभाव्य असल्याचे सांगितले जात आहे.
Published on: Mar 25, 2024 03:49 PM