शाहू महाराज दत्तक? संजय मंडलिकांची ‘त्या’ वादग्रस्त विधानानंतरही मग्रुरी कायम
संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते कोल्हापूरचे नसून खरे वारसदार नसल्याचेही विधान केलंय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसह भाजप आणि अजित पवार गटाचीही अडचण झाली आहे. संजय मंडलिक यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न काँग्रेसच्या सतेज पाटलांनी केलाय.
शाहू महाराज छत्रपतींच्या वारसावर प्रश्न उपस्थित करून संजय मंडलिक यांनी नवा वाद ओढून घेतलाय. शिवाय आपण माफी मागणार नसल्याचे म्हटल्याने हा वाद आणखीनच चिघळण्याची शक्यता आहे. संजय मंडलिक यांनी शाहू महाराज छत्रपती यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करून ते कोल्हापूरचे नसून खरे वारसदार नसल्याचेही विधान केलंय. त्यामुळे शिंदेच्या शिवसेनेसह भाजप आणि अजित पवार गटाचीही अडचण झाली आहे. संजय मंडलिक यांचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न काँग्रेसच्या सतेज पाटलांनी केलाय. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपूर्वी स्थानिक भाजप नेत्यांनी शाहू महाराज अस्मिता असल्याने वैयक्तिक टीका करणार नसल्याचे म्हटलं होतं. मात्र त्याच्या काहीच दिवसांनंतर संजय मंडलिक यांनी कोल्हापुरच्या गादीच्या वारसावर प्रश्न उभा केलाय. वादग्रस्त विधानानंतरही संजय मंडलिक यांची मग्रुरी कायम.. बघा नेमकं काय केलं होतं वक्तव्य? काय सुरूये आरोप-प्रत्यारोप?