अनेक मतदारसंघात जाहीरपणे धमक्या? ही भाषा तुम्हाला शोभते का? राऊतांचा अजितदादांवर घणाघात
बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये स्वतः अजित पवार जाहिरपणे धमक्या देतात. अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडून यायचे असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या? असा सवाल करत राऊतांनी अजितदादांवर हल्लाबोल केला आहे. बघा काय म्हणाले संजय राऊत?
राज्यातील अनेक मतदारसंघात अजित पवार धमक्या देत आहेत. सोलापुरात उत्तम जानकर यांच्या नावाने धमकी, तर बारामती आणि शिरूर मतदार संघामध्ये स्वतः अजित पवार जाहिरपणे धमक्या देतात. अनेक वर्ष आपण विधानसभेत आहात ही भाषा तुम्हाला शोभते का? निवडून यायचे असेल तर लोकांना निर्णय घेऊ द्या? असा सवाल करत राऊतांनी अजितदादांवर हल्लाबोल केलाय. तर राज्यातील काही मतदारसंघात भाजपच्या अनेक प्रमुख नेत्यांनी उमेदवारी घेण्यास नकार दिला आहे. मुंबईत असे दोन ते तीन मतदारसंघ आहेत. तिथे महायुती उमेदवार जाहीर करु शकली नाही. उत्तर मध्य मुंबईतून भाजपने उज्ज्वल निकम यांना उमेदवारी दिली. खरंतर त्यांनी जळगावातून उमेदवारी घ्यायला हवी होती. परंतू तो त्यांचा प्रश्न आहे. पण तेथे चांगली लढत होईल, असे सांगताना संजय राऊत असेही म्हणाले की, दक्षिण मुंबई, वायव्य मुंबईत त्यांना उमेदवारी मिळालेली नाही. ठाण्यात, मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात अजून उमेदवारी देण्यात आली नाही. कल्याण-डोंबिवलीतसुद्धा अधिकृत उमेदवारी जाहीर नाही, नाशिकमध्ये हीच परिस्थिती आहे. इतर काही ठिकाणी महायुतीने औपचारिकता म्हणून उमेदवार दिले आहेत. जसं की भाजपने नुकतीच उज्ज्वल निकम यांना उमेदवारी जाहीर केली. असं असलं तरी कोणी कितीही मोठ्या घोषणा करूदे, आम्ही राज्यात 35 पेक्षा अधिक जागा जिंकत आहोत, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला.