‘दोन महिन्यांनी ही वर्दी आम्हाला सलाम करेल अन् तुमची…’, संजय राऊत यांचा रोख कुणावर?
सिंधुदुर्गातील मालवण येथे असलेल्या राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. या घटनेनंतर राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोप होतायत. राजकोट किल्ल्यावर आदित्य ठाकरे आले असताना राणे देखील तिथे दाखल झाले त्यावेळी पोलिसांनी राणे आणि त्याच्या कार्यकर्त्यांना किल्ल्याच्या पायथ्याशीच अडवलं आणि पोलीस आणि राणे समर्थकांमध्ये बाचाबाची झाली.
मारून टाकेन… असं वक्तव्य नारायण राणे करतात, हे एका संसदपटूचे शब्द आहेत, का नाही अशी भाषा वापरल्यानंतर नारायण राणे यांच्यावर अटेम्पट टू मर्डरचा गुन्हा दाखल करत? असा सवाल संजय राऊत यांनी नारायण राणेंनी दिलेल्या धमकीनंतर केला आहे. तर नारायण राणे यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही असे म्हणत महाराष्ट्राचे गृहमंत्री आहेत ना महाराष्ट्रात? असा थेट सवालच संजय राऊत यांनी सरकारला केला आहे. पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, पोलिसांच्या तोंडावर थुंकण्याचा प्रयत्न झाला. भर रस्त्यात पोलिसांनाच आव्हान दिलं जातं, अरे तुरेची भाषा केली जाते.. पोलिसाच्या वर्दीचा मान ठेवा, असे वक्तव्य करत संजय राऊत यांनी पोलिसांचा आदर करण्याचं आवाहन केलं आहे. तर येत्या दोन महिन्यांनी हीच वर्दी आम्हाला सलाम करेल आणि तुमची कॉलर पकडेल, असे म्हणत संजय राऊत यांनी सरकार आणि भाजपच्या नारायण राणे यांच्यावर नाव न घेता हल्लाबोल केला आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी राजकोट किल्ल्यावर भाजप विरुद्ध ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. यावर नारायण राणेंनी प्रतिक्रिया देताना मी एकेएकाला बघतो. घरात रात्रभर खेचून एकेकाला मारुन टाकेन. कोणालाही सोडणार नाही, अशा प्रकारची संतप्त प्रतिक्रिया दिली. यानंतर विरोधकांनी एकच भाजप, सरकार आणि नारायण राणेंना सवाल करत त्यांना धारेवर धरले आहे.