थेट मशिदीतून निघताय फतवे, राज ठाकरेंचा काँग्रेससह ठाकरे गटावर गंभीर आरोप काय?

| Updated on: May 12, 2024 | 11:56 AM

राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिला. ठाकरे गट आणि काँग्रेसला मतदान करण्यासाठी मशिदीमध्ये टीव्ही स्क्रीन लावून फतवे काढले जातात. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला तर विरोधकांचा राज ठाकरे यांच्या गंभीर आरोपांवर पलटवार काय? बघा व्हिडीओ

काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला मतदान करण्यासाठी मशिदीतून फतवे निघत असल्याचा गंभीर आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे. दरम्यान, यानंतर विरोधकांनी राज ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं. काही नेते आणि पक्षाची दखल घ्यायची गरज नसते, असा टोला संजय राऊत यांनी राज ठाकरेंना लगावला आहे. राज ठाकरे यांनी केलेल्या आरोपांना देवेंद्र फडणवीस यांनी देखील दुजोरा दिला. ठाकरे गट आणि काँग्रेसला मतदान करण्यासाठी मशिदीमध्ये टीव्ही स्क्रीन लावून फतवे काढले जातात. असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला तर फतवे काढून मतदार मतदान करत नसल्याचा पलटवार जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आलाय. दरम्यान, याच मुद्द्यावरून पुण्याचे भाजपचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी महाविकास आघाडीवर जोरदार हल्लाबोल केलाय. बघा काय म्हणाले मुरलीधर मोहोळ?

Published on: May 12, 2024 11:56 AM
माझ्या नादी लागू नको… अजित पवारांची दमदाटी कुणावर? सुप्रिया सुळेंचा पलटवार काय?
बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या प्रचारास उदयनराजे भोसले भावूक, म्हणाले; तर मी राजीनामा देऊन…