संजय राऊत अन् राज ठाकरेंमध्ये जुंपली, थेट सभेतून उद्धव ठाकरेंसह राऊतांवर निशाणा, बघा शाब्दिक हल्लाबोल

| Updated on: Nov 10, 2024 | 10:54 AM

संजय राऊत यांच्यावर निशाणा साधतना मीही ठाकरे आहे, असा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर मीही बाळासाहेब ठाकरे यांनी घडवलेला संजय राऊत आहे, असा पलटवार संजय राऊत यांनी राज ठाकरेंवर केला. बघा स्पेशल रिपोर्ट

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारसभा सुरू असताना संजय राऊत आणि राज ठाकरे यांच्यात जुंपली. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका करत मी ठाकरे आहे, असा इशारा दिला. त्यावर प्रतिहल्ला करत मीही राऊत आहे, असा हल्ला संजय राऊत यांनी केला. राज ठाकरे आपल्या सभांमधून उद्धव ठाकरे यांच्या अडीच वर्षांच्या मुख्यमंत्रीपदावरून सतत निशाणा साधताना दिसताय. भाजपसोबत मतं मागून निकालानंतर उद्धव ठाकरे काँग्रेससोबत गेलेत, अशी टीका राज ठाकरेंनी केली. तर राज ठाकरे टीका करत असले तरी उद्धव ठाकरेंनी एकाही सभेतून प्रत्युत्तर दिले नाही. मात्र संजय राऊत यांनी त्यांच्या सकाळच्या पत्रकार परिषदेतून राज ठाकरेंवर निशाणा साधताय. तर संजय राऊत यापूर्वीही राज ठाकरेंच्या टार्गेटवर होते. राज ठाकरे यांनी संजय राऊत यांची मिमिक्री देखील केली आहे. आता हा सामना शाब्दिक चकमकीपर्यंत आलाय. अशातच राज ठाकरेंनी मी ठाकरे आहे असं म्हणताच मी सुद्धा राऊत आहे असं म्हणून राऊतांनी पुढच्या सामन्यासाठी तयार असल्याचे इऱादे दिलेत. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Nov 10, 2024 10:54 AM
‘साहेबांचा नाद केला आता…’, धनंजय मुंडे यांना हरवा; शरद पवार उतरले मैदानात
‘त्या गोंधळानं आमचा राजा वाचला अन् इज्जत राहिली’, भरसभेत अजितदादांची धक्कादायक कबुली