Sanjay Raut :…तर भरतीतून सैन्याची प्रतिष्ठा रसातळाला जाईल, अग्निपथ योजनेवरून संजय राऊतांचा इशारा!
देशातील विविध राज्यातून या योजनेला विरोध होत आहे.
मुंबईः अग्निपथ या सैन्यभरती योजनेवर पत्रकारांना प्रतिक्रिया देताना शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपला चांगलंच खडसावलं आहे. सैन्यात अग्निपथ (Agnipath) योजनेतून ठेकेदारीवर भरती केल्यास संपूर्ण सैन्यदलाची प्रतिष्ठा रसातळाला जाईल. भारतीय सैन्यदलाचा, सुरक्षा दलाचा हा अपमान आहे, असा इशारा शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी जाहीर केलेल्या अग्निपथ या सैन्यभरती योजनेवर सध्या चौफेर टीका होताना दिसतेय आहे. देशातील विविध राज्यातून या योजनेला विरोध होत आहे. 4 वर्षांच्या कंत्राटावर ही सैन्यभरती होणार असून त्यानंतर नोकरीची हमी नाही किंवा पेन्शनची सुविधा नाही. रँक नाही, यामुळे योजनेत भरती झालेल्या तरुणांच्या स्वप्नांचा चुराडा होईल, अशी टीका काँग्रेसच्या वतीने करण्यात आहे.
Published on: Jun 18, 2022 12:23 PM