Assembly Elections 2023 : पाच राज्यातील चषक कोण जिंकणार?, सामनातून भाजपवर घणाघात

| Updated on: Nov 26, 2023 | 10:30 AM

'गेल्या महिनाभरापासून मोदी-शहा दिल्लीला वाऱ्यावर सोडून ५ राज्यांच्या प्रचार दौऱ्यात गुंतून राहिले. देशात अनेक समस्या पण या निवडणुका जिंकणे यापलीकडे मोदी-शहांचे मन फिरताना दिसत नाही'

मुंबई, २६ नोव्हेंबर २०२३ : पाच राज्यातील निवडणुकीवरून सामनातून भाष्य करण्यात आलं आहे. अहमदाबादच्या मोदी स्टेडिअमवर भारत विश्वचषकाची लढाई हरला, तेव्हा महाशक्तिमान मोदी-शहा मैदानावरच होते. दुसरीकडे ५ राज्यांच्या निवडणुकीचा धुरळाही उडालाय.पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यासमोर गांधी आणि काँग्रेसचं आव्हान असून मोदी-शहा यांच्याकडून कपटनीतीचा अंबलंब सुरू असल्याचा हल्लाबोल सामना अग्रलेखातून करण्यात आलाय. तर 5 राज्यांमध्ये मोदी – शाहांसाठी निवडणूक सोपी नाही, असंही सामनातून म्हटलंय. गेल्या महिनाभरापासून मोदी-शहा दिल्लीला वाऱ्यावर सोडून ५ राज्यांच्या प्रचार दौऱ्यात गुंतून राहिले. देशात अनेक समस्या पण या निवडणुका जिंकणे यापलीकडे मोदी-शहांचे मन फिरताना दिसत नाही, असा घणाघातही केलाय. बघा काय करण्यात आलाय सामनातून भाजपवर हल्लाबोल?

Published on: Nov 26, 2023 10:30 AM
जालन्याच्या अंतरवालीतील ‘त्या’ घटनेवरून तिघांना अटक, जरांगे पाटील यांचा हल्लाबोल काय?
महायुतीतील लोकसभेच्या जागावाटपाची मोठी बातमी, भाजप राज्यात ‘इतक्या’ जागा लढवणार