Sanjay Raut : समृद्धी महामार्ग शापित अन् त्यावरील बळी म्हणजे…, संजय राऊत यांचा सरकारवर घणाघात
VIDEO | समृद्धी महामार्गावर वैजापूर परिसरात शनिवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू, या घडलेल्या घटनेवरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे-भाजप सरकारवर जोरदार घणाघात केला आहे. समृद्धी महामार्ग शापित आहे असल्याची टीका त्यांनी केली.
मुंबई, १५ ऑक्टोबर २०२३ | समृद्धी महामार्गावर शनिवारी रात्री झालेल्या अपघातावरून उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी शिंदे फडणवीस सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. समृद्धी महामार्ग शापित आहे. हा महामार्ग घाईघाईने बनवून त्याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करण्यात आला असून याचे परिणाम निरपराध जनता भोगतेय, असे संजय राऊत म्हणाले तर सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याच्या मागणीही संजय राऊत यांनी केली. समृद्धी महामार्गावर रोज लोकाच्या हत्या होताहेत. या सरकारी हत्या आहेत. संबंधित मंत्र्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा का करू नये? टोलचे राजकारण करण्यासाठी मंत्री धावताहेत, मग इथे कोण जाणार? यांचे प्राण कोण वाचवणार? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.
Published on: Oct 15, 2023 12:00 PM