Sanjay Raut | काँग्रेसमधील जुनेजाणते राहुल गांधी आणि पक्षाला अडचणीत आणतायत : संजय राऊत

| Updated on: Nov 12, 2021 | 11:20 AM

सलमान खुर्शीद हे देखील पुरुषी कंगणा राणावत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच काँग्रेसमधील जुनेजाणते राहुल गांधी आणि पक्षाला अडचणीत आणतायत, असंही राऊत म्हणालेत.

काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी नुकताच अयोध्येबाबत एक पुस्तक प्रकाशित केलंय. त्यामध्ये हिंदुत्व हे आयएसआय आणि बोको हराम या संघटनेप्रमाणे आहे असं वादग्रस्त लिखाण करण्यात आलंय. त्याबाबत संजय राऊत यांना विचारलं असता सलमान खुर्शीद हे देखील पुरुषी कंगणा राणावत आहेत, अशी घणाघाती टीका शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. तसंच काँग्रेसमधील जुनेजाणते राहुल गांधी आणि पक्षाला अडचणीत आणतायत, असंही राऊत म्हणालेत. दरम्यान सलमान खुर्शीद यांच्या या पुस्तकातल्या वादग्रस्त लिखाणाबाबत काँग्रेस नेते गुलाब नबी आझाद यांनीही ही तुलना योग्य नसल्याचे म्हटले आहे.

SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 November 2021
100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 8 AM | 12 November 2021