Sanjay Raut | भाजपच्या कंगनाबेनकडून स्वातंत्र्याचा अपमान, तिला दिलेले पुरस्कार काढून घ्या : संजय राऊत

| Updated on: Nov 12, 2021 | 11:14 AM

कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे राऊत यांनी म्हटले.

संजय राऊत यांनी कंगना रनौत  आणि भाजपावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ”भारताला 15 ऑगस्ट 1947 साली  स्वातंत्र्य मिळाले नव्हते, ती भीक होती. देशाला खरे स्वातंत्र्य 2014 मध्ये मिळाले’’, अशी मुक्ताफळे अभिनेत्री कंगना रनौतने एका कार्यक्रमात उधळली होती. यावरू मोठा वाद निर्माण झाला आहे. आता या वादात संजय राऊत यांनी देखील उडी घेतली असून, कंगनाच्या वक्तव्यावर त्यांनी संताप व्यक्त केला आहे. कंगनाने देशाचा अपमान केला आहे. तिला असे वक्तव्य करायची सवयच आहे. तिच्या या वक्तव्यामुळे भारतीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. त्यामुळे तिने देशाची माफी मागावी. तिचे सर्व राष्ट्रीय पुरस्कार परत घेतले जावेत. भाजपाने देखील ‘कंगनाबेन’च्या या वक्तव्यावर आपली भूमिका स्पष्ट करावी असे राऊत यांनी म्हटले. ते मुंबईमध्ये आयोजित पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते.

MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 12 November 2021
SuperFast News | सुपरफास्ट 50 गाव 50 बातम्या | 12 November 2021