एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावरून जाणार? दिल्लीत हालचाली सुरू, संजय राऊत यांनी काय केला मोठा दावा?
VIDEO | ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्याकडून पुन्हा एकदा सरकार जाण्याचं भाकीत, येत्या 15 ते 20 दिवसात राज्यातील सरकार जाणार अन्... नेमका काय केला दावा?
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी काल एकदा शिंदे-फडणवीस सरकार कोसळण्याबाबत भाकित केलं आहे. संजय राऊत म्हणाले, पुढच्या पंधरा ते वीस दिवसात हे सरकार कोसळेल, सरकारचं डेथ वॉरंट तयार आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी भाजप शिंदे गट युतीतील सरकारवर जोरदार निशाणा साधला होता. त्यानंतर आज संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत मोठा दावा केला आहे. राज्यातील मुख्यमंत्री बदलण्यासाठी दिल्लीत हालचाली सुरू आहेत, असा थेट दावा संजय राऊत यांनी केला आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदावरून जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राज्यातील सरकारला धोका नाही. पण मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली सुरू आहेत, असं राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ म्हणाले होते. त्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. ते म्हणाले, मुख्यमंत्री बदलाच्या हालचाली दिल्लीत पडद्यामागे सुरू आहेत. त्याची कारणं काय आहेत हे सर्वांना माहीत आहे. भुजबळांकडे जास्त माहिती असेल तर त्यांनी सांगावं. पण मला माहिती आहे की मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असून येत्या 15 दिवसांमध्ये सरकार पडणार, यावर मी ठाम आहे, असं संजय राऊत म्हणाले.