‘ज्या दिवशी सरकार कोसळेल तेव्हा पहिली कारवाई….’, संजय राऊतांची पुन्हा नवी भविष्यवाणी

| Updated on: Jun 23, 2024 | 1:40 PM

केंद्रीय निवडणूक आयोग पक्षपाती आहे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. २०२४ च्या निव़डणुकीत भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते, असे म्हणत टीका करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे.

केंद्रीय निवडणूक आयोग पक्षपाती आहे, त्यांच्यावर कारवाई करायला हवी, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केले आहे. इतकंच नाहीतर केंद्रातलं सरकार कोसळल्यावर तीन अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे संजय राऊत यांनी म्हटले आहे. दरम्यान, सामनाच्या रोखठोक सदरातूनही केंद्रीय निवडणूक आयोगावर निशाणा साधण्यात आला आहे. २०२४ च्या निव़डणुकीत भारताच्या केंद्रीय निवडणूक आयोगाचे वर्तन सरळ पक्षपाती होते, असे म्हणत टीका करण्यात आली आहे. त्यानंतर संजय राऊत यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला आहे. ‘पक्षपातीपणे काम केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगावर कारवाई झाली पाहीजे. सध्याचं सरकार हे अस्थिर आहे. पण ज्यावेळी हे सरकार कोसळेल तेव्हा सर्वात पहिली कारवाई ही निवडणूक आयोगातील तीन अधिकाऱ्यांवर होणार’, असे संजय राऊत म्हणाले.

Published on: Jun 23, 2024 01:40 PM
‘जे खोटं, बोगस ते दिलं, सत्य ते दिलं नाही; पण 13 तारखेच्या आत….’, जरांगेंचा पुन्हा सरकारला इशारा
‘तो काय माणूस आहे का? तो कसला दिलबऱ्या…भुजबळ तर…’, एकेरी उल्लेख करत जरांगेंचा निशाणा