जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; संजय राऊत म्हणाले, ‘ते उत्तम ड्रायव्हर अन् राज्यही…’

| Updated on: Nov 22, 2024 | 3:55 PM

पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. तरीही उद्धव ठाकरेंनीही उत्तर राज्य चालवलं. त्यांच्या इतकं उत्तम राज्य कोणीच चालवलं नाही. त्यांच्या नेतृत्वात सरकार बनवू, असे संजय राऊत म्हणाले.

विधानसभा निवडणुकीच्या निकालाचे काऊंटडाऊन सुरु असून अवघे काही तास शिल्लक आहेत. यामुळे उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. तर दुसरीकडे उद्या विजयाचा गुलाल कोण उधळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. अशातच संजय राऊत यांनी जयंत पाटील यांच्या हाती असलेल्या कारच्या स्टेअरिंगवरून खोचकपणे भाष्य केले आहे. उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानी जात असताना जयंत पाटील, संजय राऊत आणि बाळासाहेब थोरात यांनी एकाच गाडीने प्रवास केल्याचे पाहायला मिळाले. यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग जयंत पाटील यांच्या हातात असल्याचे पाहायला मिळाले. यावरून संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. ‘जयंत पाटील हे उत्तम ड्रायव्हर आहेत. ते उत्तम राज्यही चालवू शकतात’, पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांवर संजय राऊत यांनी अशी प्रतिक्रिया दिली आहे. पुढे संजय राऊत असेही म्हणाले की, उद्धव ठाकरे यांना सरकार चालवण्याचा अनुभव नव्हता. तरीही उद्धव ठाकरेंनीही उत्तर राज्य चालवलं. त्यांच्या इतकं उत्तम राज्य कोणीच चालवलं नाही. त्यांच्या नेतृत्वात सरकार बनवू, असे संजय राऊत म्हणाले. ‘गेल्या तीन ते चार वर्षांपासून आमची महाविकास आघाडी ही एकत्रित प्रवास करते.महाविकास आघाडी ही स्वबळावर सत्तेत येते आणि जे सत्तेत बसले होते. त्यातील प्रत्येक जण हा निष्णात ड्रायव्हर आणि सारथी आहे. आता त्या गाडीत आणखी कोणी या गाडीत बसणार आहे का? हे निकाल लागल्यावर कळेलं’, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं.

Published on: Nov 22, 2024 03:55 PM
Rohit Pawar : ‘मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या 25-30 कार्यकर्त्यांचा…’, रोहित पवार यांचा गंभीर आरोप
Bacchu Kadu : बच्चू कडूंना महायुती अन् मविआकडून फोन सुरू, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला? स्पष्टच म्हणाले…