संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे पंतप्रधान बनू शकतात; सूचवले PM पदासाठी ‘हे’ ३ चेहरे
उद्धव ठाकरे पंतप्रधान बनू शकतात. यासोबतच राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे हेदेखील पंतप्रधान बनू शकतात, असं संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजित पवार यांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई, २६ डिसेंबर २०२३ : उद्धव ठाकरे पंतप्रधान बनू शकतात. यासोबतच राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे हेदेखील पंतप्रधान बनू शकतात, असं संजय राऊत यांनी वक्तव्य केले आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, भाजपकडे दहा ते पंधरा वर्षांपासून एकच घिसापीटा चेहरा आहे. जनतेला पर्याय हवा ना? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. इंडिया आघाडीकडे पंतप्रधान पदाचा चेहरा नाही, अशी टीका राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली होती. अजित पवार यांच्या या टीकेवर संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. तर पीएम पदाचे तीन चेहरे देऊन संजय राऊत यांनी देश वाटायचं ठरवलंय का, असे म्हणत भाजप नेते आशिष शेलार यांनी संजय राऊत यांना खोचक टोलाही लगावला आहे.
Published on: Dec 26, 2023 06:23 PM