… म्हणून शिंदे सरकारची फाटली, संजय राऊत यांच्या बंधूनं काय केला घणाघात?
सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांची चौकशी होईल आणि ते लवकरच तुरुंगात जातील, असं भाष्यही संजय शिरसाट यांनी केले आहे. यानंतर संजय राऊत यांचे ज्येष्ठ बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नागपूर, १८ डिसेंबर २०२३ : सलीम कुत्ता प्रकरणाचे धागेदोरे हे संजय राऊत यांच्यापर्यंत असल्याचं मोठं वक्तव्य शिवसेना आमदार संजय शिरसाट यांनी केले आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांची चौकशी होईल आणि ते लवकरच तुरुंगात जातील, असं भाष्यही संजय शिरसाट यांनी केले आहे. यानंतर संजय राऊत यांचे ज्येष्ठ बंधू सुनील राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. संजय राऊत यांना बदनाम करण्यासाठी, कोणत्या न कोणत्या प्रकरणात अटक करण्याचा प्रयत्न करायचा, मात्र संजय राऊत तसा नाही. ईडीच्या एका खोट्या प्रकरणात कोर्टाने त्यांच्याबाबत जो निकाल दिला त्यामुळे विरोधकांची फाटली आहे, असे म्हणत सुनील राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला. संजय राऊत ज्या आक्रमकतेने सरकारवर तुटून पडलेले आहेत, त्यामुळे कुठे ना कुठेतरी या सगळ्यांची आग पाखड होत आहे. सलीम कुत्ताशी आमचे कोणतेच संबंध नाही, कधीही नव्हता… केवळ दबावतंत्राचा वापर हे सरकार करत आहे, असा आरोपही त्यांनी केला.