घाण, सडक्या विचाराची ही लोकं, मंत्री केसरकरांना चप्पलेनं मारलं पाहिजे; ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा हल्लाबोल

| Updated on: Aug 28, 2024 | 1:42 PM

शिवरायांचा पुतळा पडल्याने त्यातून काही शुभ घडेल असं म्हणणारी माणसं मंत्रिंडळात असूच कशी शकतात. हे देवेंद्र फडणवीस यांचंच पाप आहे. तर शिवाजी महाराजांचे का एवढे शत्रू झालेत? असा सवाल करत संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा पडला ही राज्याच्या मनावर झालेली जखम आहे. शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबद्दल अशी बेताल वक्तव्य करणाऱ्या मंत्र्याला चप्पलेने मारलं पाहिजे, असं म्हणत संजय राऊत यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आव्हान दिलं आहे. असं असताना काही माणसं म्हणताय बरं झालं महाराजांचा पुतळा पडला आणि त्यातून काही चांगलं घडेल असं वक्तव्यं करत आहेत. अशी वक्तव्य करणारे माणसं ही अफजल खानाची औलाद आहे. ही माणसं मिंध्यांनी पोसलेली आहेत. ही अशी माणसं आहेत, जी आमच्याकडून त्यांच्या मंत्रिमंडळात गेली आहेत. हे सडक्या विचाराचे लोक आहेत. बरं झालं ही घाण आमच्यातून गेली हे बरं झालं, असा हल्लाबोलच संजय राऊत यांनी सरकारवर केला आहे. तर नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या टोळीने पैसे खाण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पाडला, हा आरोप नाहीतर सत्य असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे.

Published on: Aug 28, 2024 01:42 PM
शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी भाजपचं केंद्रीय नेतृत्व राज्य सरकारवर नाराज, नेमकं काय म्हणाले?
‘फडणवीस स्वतःची जमीन, बंगला विकून पैसे देत नाही तर..’, ‘लाडकी बहीण’वरून जरांगे पाटलांनी डिवचलं