Saamana : … तर 2024 च्या निवडणुकीआधी मोदींनी पाकच्या संगनमतानं बॉम्ब टाकला असता, संजय राऊतांचा अजब दावा
सामनातील रोखठोकमधून संजय राऊत यांनी अजब दावे केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर 2024 च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता, असा दावा राऊतांनी केलाय
मुंबई, १० डिसेंबर २०२३ : सामनातील रोखठोकमधून संजय राऊत यांनी अजब दावे केल्याचे समोर आले आहे. मध्य प्रदेश, राजस्थान काँग्रेसने जिंकले असते तर 2024 च्या निवडणुकीआधी मोदी यांनी पाकिस्तानशी संगनमत करून एखादा बॉम्ब टाकला असता, असा दावा राऊतांनी केलाय तर एखादे नवे ‘पुलवामा’ घडताना उघड्या डोळय़ाने पाहिले असते, असा घणाघातही त्यांनी केलाय. संजय राऊत यांनी असे म्हटले, कश्मीरातील हिंसाचारात पाकिस्तानचा हात व ‘देश खतरे में’च्या गर्जना करून ‘देशभक्ती’साठी मते मागितली असती. जवानांच्या शव पेटय़ांना वंदन करण्याची छायाचित्रे फिरवून आपल्यासारखे आपणच, दुसरे कोणी नाही हे ठसवण्याचा प्रयत्न झाला असता. प्रकाश आंबेडकर वारंवार सांगतात त्याप्रमाणे लोकसभा निवडणुकीआधी दंगली व मोठ्या नरसंहाराचा बेत तडीस नेला असता, आशा आहे, तीन राज्यांतील विजयांमुळे हे बेत तूर्त रहीत केले जातील! पण तीन राज्यांमधील विजय म्हणजे 2024 च्या विजयाचा शंखनाद या भ्रमात जे आहेत त्यांनी त्याच भ्रमात राहणे देशहिताचे आहे!