पक्षप्रमुख कोण होणार? हे पक्षचं ठरवेल, संजय राऊत यांनी केलं स्पष्ट
पक्षप्रमुख ठरवणे न ठरवणे हा तांत्रिक मुद्दा आहे. म्हणून पक्षप्रमुख कोण होणार? हे पक्षचं ठरणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
पक्षप्रमुख कोण होणार? हे पक्षचं ठरवेल. इतर कोणीही ठरवणार नाही. पक्षप्रमुख ठरवणे न ठरवणे हा तांत्रिक मुद्दा आहे, असे संजय राऊत जम्मूच्या दौऱ्यावर असताना म्हणाले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेऊन विविध मुद्यांवर भाष्य केले. तसेच जम्मूत शिवसेना निवडणूक लढणार असल्याचेही जाहीर केले. पक्षाचा अध्यक्ष ठरवण्याच्या प्रकरणात निवडणूक आयोग आला आहे. पण आमचा अध्यक्ष कोण असावा हे आमचा पक्ष ठरवेल. बाळासाहेब ठाकरे हे शिवसेनेचे अजीवन अध्यक्ष होते. निवडणूक आयोगाने नियम केल्यानंतर आम्ही नंतर निवडणूक घ्यायचो. उद्धव ठाकरे पक्षाचे अध्यक्ष आहेत. तेच राहतील, असेही संजय राऊत यांनी स्पष्ट केले. चार चार महिने निवडणूक आयोग या निर्णयावर निकाल देत नसेल तर याचा अर्थ असा की, निवडणूक आयोगावर सरकारकडून दबाव टाकण्यात आला आहे. असे असले तरी मला विश्वास आहे की, सरकारची दबाव खेळी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर चालणार नाही, असे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.