Sanjay Raut : विनोद तावडेंकडून पैसे वाटप, हितेंद्र ठाकूर यांना कोणी दिली टीप? संजय राऊतांनी थेट सांगितलं…

| Updated on: Nov 19, 2024 | 4:19 PM

बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. अशातच या राड्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडून कोट्यावधी रूपयांचे वाटप होत असल्याची टीप हितेंद्र ठाकूर यांना कोणी दिली? यावर बोलताना संजय राऊत यांनी थेट सांगितलं...

भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यामुळे बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना घेरलं आहे. अशातच या राड्यावर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. दरम्यान, विनोद तावडे यांच्याकडून कोट्यावधी रूपयांचे वाटप होत असल्याची टीप हितेंद्र ठाकूर यांना कोणी दिली? यावर बोलताना संजय राऊत यांनी थेट सांगितलं, ‘माझ्याकडे तीच माहिती. तावडेंची माहिती महाराष्ट्रातील भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर यांना दिली. तावडे भविष्यात आपल्याला जड होतील. हा बहुजन समाजाचा चेहरा आहे. राष्ट्रीय महासचिव आहे. राज्यांची काही सूत्रे त्यांच्याकडे आहेत. मोदी आणि शाह यांच्या जवळचा माणूस आहे. त्यांना पकडून देण्यासाठीच भाजपमध्येच कारस्थान झालं. ज्यांच्याकडे गृहखातं असतं त्यांना याबद्दल जास्त माहिती असते.’ पुढे राऊत असेही म्हणाले, निवडणूक आयोग निपक्षपाती असतं तर जी कारवाई कार्यकर्त्यांनी केली ती आयोगाने केली असती.विनोद तावडेंकडे १५ कोटीपेक्षा जास्त रक्कम होती असं ऐकलं. त्यातील ५ कोटी रुपये स्थानिक आमदार क्षितीज ठाकूर यांच्या ताब्यात आहेत असं मी ऐकलं. त्याबद्दल त्या कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं पाहिजे. सत्ताधारी पक्ष कोणत्या पद्धतीने निवडणूक लढवत आहे हे कार्यकर्त्यांनी दाखवून दिलं आहे, असे म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय.

Published on: Nov 19, 2024 04:19 PM
विरारमध्ये अभूतपूर्व राडा, तावडेंना तीन तास घेरलं, विवांत हॉटेल रुम नंबर 404 मध्ये 9 लाखांचे बंडल, ‘बविआ’कडून भांडाफोड
मतदानाच्या आधल्या दिवशीच नालासोऱ्यात राडा अन् डहाणूत मोठा राजकीय भूकंप