विरोधकांची आदळआपट म्हणजे वादळ नाही
आज मुंबईत (mumbai) होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे, कारण महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात मागच्या महिनाभरात अनेक घटना घडल्या आहेत.
आज मुंबईत (mumbai) होणार अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरेल अशी अनेकांनी शंका व्यक्त केली आहे, कारण महाराष्ट्राच्या (maharashtra) राजकारणात मागच्या महिनाभरात अनेक घटना घडल्या आहेत. काल देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आम्हाला सरकारशी बोलायचं आहे, आम्ही त्यांना अनेक प्रश्न विचारणार आहोत असं सांगितलं आहे. तसेच नवाब मलिकांना ईडीने ताब्यात घेतलं आहे, त्यांची चौकशी देखील सुरू तरीही महाविकास आघाडीच्या सरकारने त्यांचा राजीनामा घेतलेला नाही. मराठा आणि ओबीसी आरक्षणाचं काय झालं हे सुध्दा आम्ही त्यांना विचारणार असल्याचं देवेंद्र फडणवीस प्रसार माध्यमांना सांगितलं आहे. देवेंद्र फडणवीसांनी आपली भूमिका मांडल्यानंतर आज सामनाच्या (samana) अग्रलेखातून त्यांच्यावरती टीका करण्यात आली आहे. वादळ नव्हे, आदळआपट ! असं सामनाच्या अग्रलेखाचं हेडर असून त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना फक्त आदळ आपट करायची सवय असल्याचे म्हणटले आहे. महाविकास आघाडीच्या नेत्यांवरती झालेल्या आरोपांची राळ उडवून वादळ निर्माण करतील अशी टीका त्यांच्यावरती करण्यात आली आहे.