Sanjay Raut : तुम्ही इतके घाबरले की, इंडियाचं नाव तुम्ही भारत केलंय; संजय राऊत यांचा रोख नेमका कुणावर?
काही लोकांना इंडिया अलायन्सची फार चिंता वाटते की, इंडिया अलायन्सचं कसं होणार? इंडिया अलायन्सचं अत्यंत ठीक चाललेलं आहे. याची चिंता पंतप्रधान मोदींना आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना करण्याची गरज नाही, असे म्हणत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी निशाणा साधला आहे.
मुंबई, ६ नोव्हेंबर २०२३ | काही लोकांना इंडिया अलायन्सची फार चिंता वाटते की, इंडिया अलायन्सचं कसं होणार? इंडिया अलायन्सचं अत्यंत ठीक चाललेलं आहे. याची चिंता पंतप्रधान मोदींना आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांना करण्याची गरज नाही, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला तर इंडिया अलायन्समध्ये नितीश कुमार यांचं स्थान फार महत्त्वाचं आहे. यासोबत उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, लालू प्रसाद यादव, अखिलेश यादव हे सगळे एक दुसऱ्यांच्या संपर्कात आहेत. यावेळी राऊतांनी इंडिया अलायन्सचा अर्थ देखील सांगितला ते म्हणाले, इंडिया अलायन्स ही 2024 साली आम्हाला भ्रष्ट सरकार, एकाधिकारशाही आणि हुकूमशाहीचा पराभव करायचा आहे. म्हणून इंडिया अलायन्स आम्ही निर्माण केली आहे. पुढे राऊत असेही म्हणाले की, अमित शहा यांनी स्वतःच्या घरात पहावं. पाच राज्यात तुमचा दारुण पराभव इंडिया अलायन्स करत आहेत. तुम्ही घाबरून इंडियाचं नाव आता भारत करायला लागला आहात तो पूर्वीच आहे.