Video : टोले देत-घेत, दोन देत चार घेत असं उत्तमप्रकारे अधिवेशन पार पडलं : संजय राऊत

| Updated on: Dec 29, 2021 | 10:33 AM

राजकारणात आज काल सर्व लोक रक्कम घरी ठेवतात, मात्र दुसऱ्याच्या घरी मिळाली की चर्चा होती. लखनऊ, कनोज येथे 180 कोटींचं अत्तर मिळालं आहे. या अत्तराचा उपयोग करुन तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? राजकारणामध्ये हमाम मे सब नंगे है, असं संजय राऊत म्हणाले.

राजकारणात आज काल सर्व लोक रक्कम घरी ठेवतात, मात्र दुसऱ्याच्या घरी मिळाली की चर्चा होती. लखनऊ, कनोज येथे 180 कोटींचं अत्तर मिळालं आहे. या अत्तराचा उपयोग करुन तुम्ही निवडणूक लढवणार आहात का? राजकारणामध्ये हमाम मे सब नंगे है, असं संजय राऊत म्हणाले. उत्तर प्रदेशच्या 71 व्यापाऱ्यांकडे 180 कोटी रुपयांचं घबाड सापडल्यानं देशात प्रत्येकाला अत्तर विकावं असं वाटतंय. कुणी किती काही म्हणलं तरी त्या  अत्तराशिवाय राजकारण करु शकत नाही. राजकारणाच्याच म्हणजेच हमाम मे सब नंगे  असतात.  जितकी आपण जास्त चर्चा करु तितका त्याचा गंध पसरेल, असं संजय राऊत म्हणाले. मुख्यमंत्र्यांची प्रकृती स्थिर आहे. विधानसभेचं कामकाज सुरळीत पार पडलं. अजित पवार यांच्यावर जबाबदारी होती. टोले देत टोले घेत दोन देत चार घेत अधिवेशन पार पडलं, असं संजय राऊत म्हणाले.

Gopichand Padalkar | शंभूराज देसाई यांची माहिती खोटी, पोलीस माझे नाहीत तुमचे; पडळकरांनी स्टेशन डायरी वाचली
यवतमाळच्या बाभूळगाव तालुक्यात तुफान गारपीट, अनेक ठिकाणी बर्फाचा मोठा खच तयार