‘एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल, येत्या 26 तारखेनंतर…’, संजय राऊतांनी काय केला मोठा दावा?
पालघरमधून यंदा श्रीनिवास वनगा यांच्या ऐवजी भाजपमधून आलेल्या राजेंद्र गावित यांना तिकीट मिळालं आहे, यावर प्रतिक्रिया देताना शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा हे ढसाढसा रडलेत. ‘उद्धव ठाकरे यांच्यासारख्या देव माणसाला सोडलं. त्यांच्यामुळे मी आमदार झालो पण घातकी माणसांना साथ देऊन घात झाला’, असं वनगा म्हणालेत.
ही सर्व कर्माची फळं असतात, एकनाथ शिंदेंनाही रडू कोसळेल, असं वक्तव्य संजय राऊत यांनी केलं आहे. तर शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्या घरवापसीवर बोलताना पश्चाताप झाला आता घरी बसा… असं संजय राऊत म्हणालेत. ‘श्रीनिवास वनगा हे आमदार झालेत ते काही एकनाथ शिंदे यांच्यामुळे नाही, ते उद्धव ठाकरे यांच्यामुळे आमदार झालेत. पण हे महाशय सुरतला गेले, गुवाहाटीला गेलेत. गोव्याला गेलेत. त्यांना तिथे आम्ही नाचतानाही पाहिलं. तेव्हा त्या भागातील अनेकांना रडू कोसळलं होतं. काय हा आमदार याला आम्ही निवडून दिलं होतं आणि आज आमच्याविरोधात तांडव करतोय. हे आपल्या कर्माची फळं असतात ते अनेकांना भोगावी लागतील. एकनाथ शिंदे यांनाही ते भोगावे लागतील. २६ तारखेनंतर एकनाथ शिंदे यांना सुद्धा रडू कोसळले’, असे संजय राऊत यांनी म्हणत शिंदे गटाचे आमदार श्रीनिवास वनगा यांच्यावर जोरदार निशाणा साधला. बघा संजय राऊत नेमकं काय म्हणाले?