Sanjay Raut | भाजपच्या कार्यालयातून EDची सूत्र हालणार असतील तर महाविकाआघाडीला त्रास होणार हे गृहित
भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल हे 2024 पर्यंत सुरु राहील. मात्र, 2024 पासून उलटी गंगा वाहायला सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले.
भाजपच्या कार्यालयातून ईडीची सूत्र हालत असतील तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसला त्रास होणार हे गृहीत धरलं आहे. जया बच्चन यांची सूनबाई आणि लेकासंदर्भात वाचलं आहे. जे सरकारला प्रश्न विचारतील त्यांना त्रास दिला जाईल हे 2024 पर्यंत सुरु राहील. मात्र, 2024 पासून उलटी गंगा वाहायला सुरुवात होईल, असं संजय राऊत म्हणाले. केंद्र सरकारनं ओमिक्रॉनसंदर्भात सूचना दिल्या आहेत. केंद्रांच्या सूचनाप्रमाणं अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात आला आहे. विरोधकांना गोंधळ घालण्यासाठी अधिवेशनाचा कालावधी वाढवायचा का? असा सवाल संजय राऊत यांनी केला.