अजित पवार यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा; संजय राऊत म्हणताय, ‘त्यांच्यात क्षमता पण लायकी नसलेले…’

| Updated on: Apr 22, 2023 | 2:14 PM

VIDEO | राष्ट्रवादीचे नेते अजित पवार भावी मुख्यमंत्री? संजय राऊत यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले बघा व्हिडीओ

जळगाव : गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चांनी राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती. मात्र अजित पवार यांनी स्वतः पत्रकार परिषद घेत या उधाण आलेल्या चर्चांना अजित पवार यांनी पूर्णविराम दिला. दरम्यान, अजित पवार यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी 2024ची वाट का पाहायची? असा सवाल अजित पवार यांनी केला आहे. अजित पवार यांच्या या इच्छेवर सत्ताधाऱ्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनीही त्यावर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांच्यात मुख्यमंत्री बनण्याची क्षमता असून ते अनुभवी आहेत. अनेकांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा असते, असं बोलत असताना लायकी नसताना काही लोक मुख्यमंत्री झाले आहेत, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं नाव न घेता केली आहे. उद्धव ठाकरे यांची उद्या जळगावात जाहीर सभा होणार आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे या सभेला संबोधित करणार आहेत. या सभेच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी संजय राऊत जळगावात आले आहेत. यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधला आहे.

Published on: Apr 22, 2023 02:13 PM
महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूंकप होणार? या आमदारानं केला मोठा दावा अन् उडाली खळबळ
EID 2023: सलमान खानकडून मोठ्या सुरक्षा व्यवस्थेत चाहत्यांना ईदच्या शुभेच्छा