‘ताई, माई, अक्का… माझा पक्ष छ#@*’; शिंदे गटाच्या ‘त्या’ मिशनवर संजय राऊतांची वादग्रस्त टीका
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यभर महिला मेळावे घेणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाच्या मिशनवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिंदे गटाचं ताई, माई, अक्का… असं मिशन असणार आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी राज्यभर महिला मेळावे घेणार आहेत. दरम्यान, शिंदे गटाच्या मिशनवर ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. मात्र संजय राऊत यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावर आता राजकीय वाद चिघळण्याची शक्यता आहे. ‘शिंदे गट आईच्या पाठीत खंजीर खुपसून राजकारण करत आहे. तर शिंदे गटाला खंजीर पुरवण्याचं काम अमित शाह, देवेंद्र फडणवीस आणि नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.’, असं संजय राऊत म्हणाले. पुढे संजय राऊत शिंदे गटावर हल्लाबोल करताना असेही म्हणाले, माझं तोंड घराब आहे असं म्हणतात लोकं… ताई, माई, अक्का… माझा पक्ष छ#@*, असं बोललं तर काय होईल? पण मी असं बोलणार नाही. असं बोललो तर त्यांचा अपमान होईल. या फौजेने शिवसेने सारख्या आईच्या पाठित खंजीर खुपलं आणि ते खंजीर खुपसून राजकारण करत आहेत, असं संजय राऊत म्हणाले.