Sanjay Raut : पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती पण आता…., संजय राऊत यांनी IND vs AUS सामन्यावरूनही डिवचलं
वनडे वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. या सामन्याकडे सर्व देशासह जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलंय. अशातच संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. खेळ हा खेळ असतो. खेळालाही इव्हेंटपासून सोडायला तयार नाहीत, राऊतांचा निशाणा
मुंबई, 19 नोव्हेंबर 2023 : वनडे वर्ल्ड कप २०२३ चा अंतिम सामना हा भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये रंगणार आहे. क्रिकेटप्रेमींना अनेक दिवसांपासून या सामन्याची प्रतिक्षा होती. हा अंतिम सामना आज अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये होणार आहे. या सामन्याकडे सर्व देशासह जगातील क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागलंय. अशातच संजय राऊत यांनीही यावर भाष्य केले आहे. खेळ हा खेळ असतो. खेळालाही इव्हेंटपासून सोडायला तयार नाहीत. ज्यांना आनंद घ्यायचाय त्यांना घेऊद्या. पूर्वी मुंबई क्रिकेटची पंढरी होती. अशा प्रकारच्या खेळांचे उत्सव हे दिल्ली, मुंबई किंवा कलकत्ता येथे व्हायचे. मात्र आता मुंबईतून संपूर्ण क्रिकेट अहमदाबाद येथे हलवण्यात आलं. कारण राजकीय इव्हेंट करायचं आहे, असे म्हणत संजय राऊत यांनी अप्रत्यक्षपणे भाजपनं निशाणा साधला. पुढे राऊत भारतीय संघाला शुभेच्छा देत असेही म्हणाले की, जर आपण जिंकलो तर मोदी थे इसलिये हम जित गये, मोदी है तो वर्ल्डकपची जीत मुमकीन है…, असं म्हणत त्यांनी खोचक टोला लगावलाय.