शिवसेना-मनसेचं काहीतरी जुळतंय? राज ठाकरे आणि मुख्मंत्र्यांच्या भेटीसंदर्भातील बघा स्पेशल रिपोर्ट

| Updated on: Mar 27, 2023 | 11:35 PM

VIDEO | राज ठाकरे आणि मुख्मंत्र्यांच्या भेटीवर सदू-मधू भेटले अशी संजय राऊतांची टीका, बघा या संदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

मुंबई : उद्धव ठाकरे यांची मालेगावातली सभा बघून मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दोघे एकमेकांचे आश्रु पुसण्यासाठी भेटले होते, अशी खोचक टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली होती. राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे हे दोघे भेटले तर आम्ही काय करणार सदू आणि मधू भेटले एवढेच या भेटीचं वर्णन करता येईल अशी खोचक टीका करत संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्या भेटीवर प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पुन्हा राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवास्थानी आले. त्यामुळे शिवसेना आणि मनसेमध्ये नेमकं काय घडतंय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे पाहायला मिळाले. जवळपास सव्वातास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात भेट झाली. मात्र या दोघांच्या भेटीचा आणि उद्धव ठाकरे यांच्या मालेगावातील सभेचा टायमिंग एकदम सेम होता, त्यामुळे राजकीय वर्तुळात प्रश्नांवर प्रश्न उपस्थित होताना दिसले. दरम्यान, शिंदे आणि राज ठाकरे यांच्यात सव्वा तासात नेमकी कोणती चर्चा झाली? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीच्या वेळेतच का राज ठाकरे यांच्या भेटीस गेले? असे अनेक प्रश्न उपस्थित झाल्याचे पाहायाला मिळाले. बघा या संदर्भातील टीव्ही ९ मराठीचा स्पेशल रिपोर्ट

 

 

 

 

 

 

 

 

 

Published on: Mar 27, 2023 11:33 PM
कर्नाटक सरकारच्या निषेधार्थ संभाजी आरमारची निदर्शन, काय आहे कारण?
मुंबई-अहमदाबाद प्रवास आता सुसाट होणार, कसा? पाहा व्हीडिओ…