पंतप्रधान मोदींना आता राहुल गांधींना रामराम करावा लागेल, संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना आता रोज शिष्टाचारानुसार राहुल गांधी यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असे वक्तव्य करत राऊतांनी खोचक टोला लगावला आहे.
गेल्या दहा वर्षांत नरेंद्र मोदी यांच्या अटी, शर्तीवर लोकसभा चालली. परंतु आता ते शक्य नाही. कारण विरोधी पक्ष मजबूत आहे. आता राहुल गांधी विरोधी पक्षनेते झाले आहेत. त्यांना आता रोज शिष्टाचारानुसार राहुल गांधी यांना रामराम करुन नरेंद्र मोदी यांना लोकसभेत यावे लागणार आहे. संसदेचं अधिवेशन सुरू असताना सभागृहातून नरेंद्र मोदी यांना पळ काढता येणार नाही, असे संजय राऊत यांनी म्हणत खोचक टोला लगावला. तर लोकसभेत अध्यक्षपद सत्ताधारी तर उपाध्यक्षपद विरोधी पक्षाला दिले जाते. सदनात ही परंपरा राहिली आहे. आता तर विरोधी पक्ष मजबूत आहे. 240 पेक्षा जास्त खासदार विरोधी पक्षाकडे आहे. परंतु त्यानंतरही लोकसभेतील परंपरा सत्ताधारी पक्षाने मोडल्याने आता विरोधकांना एकजूट दाखवणे गरजेचे आहे. सत्ताधारी पक्षाने लोकसभा अध्यक्षाची निवडणूक लादली असल्याचे म्हणत राऊतांनी हल्लाबोल केलाय.