‘मी पंतप्रधानांचा आभारी आहे’, संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे का मानले आभार?

| Updated on: Aug 09, 2023 | 11:04 AM

VIDEO | 'शिवसेनेनेच युती तोडली', पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा पलटवार, काय केली टीका?

मुंबई, ९ ऑगस्ट २०२३ | शिवसेनेनेच युती तोडली, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला. या दाव्यावर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पलटवार केला. ‘शिवसेनेने युती तोडली असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील तर ते दिशाभूल करत आहेत. 2014ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. 2014 मध्ये युती कोणी आणि का तोडली’, असे म्हणत संजय राऊत यांनी निशाणा साधला. तर पत्रकार परिषदेत बोलत असताना संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानत खोचक टोला लगावल्याचे पाहायला मिळाले. ‘मी पंतप्रधानांचा आभारी आहे. ते नेहमी सामना वाचतात. सामनाची दखल घेतात आणि आपल्या सहकाऱ्यांनाही सामना माझ्यावर टीका करत असतो असं सांगतात.’ पुढे संजय राऊत असेही म्हणाले, सामनातील भूमिका या शिवसेनेच्या अधिकृत भूमिका आहेत. पंतप्रधानांनाही सामना आणि उद्धव ठाकरे यांच्या भूमिकेवर चर्चा करावी लागते. कारण आम्ही ओरिजनल आहोत असे म्हणत राऊत म्हणाले जनतेला उद्धव ठाकरे यांच्या भूमिका मान्य आहेत, त्यामुळे तुम्हाला आमची दखल घ्यावी लागतेय. कितीही हल्ले केले तरी सामना आणि शिवसेना शरण जात नाही ही त्यांची वेदना मोदींनी बोलून दाखवल्याचेही त्यांनी म्हटले.

Published on: Aug 09, 2023 11:04 AM
‘अध्यक्षांनी निर्णय लांबवणे ही लोकशाहीची हत्याच’; काँग्रेसनेत्याची नार्वेकर यांच्यावर निशाना
राष्ट्रवादीचा बडा नेता अन् माजी आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देणार? शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला आणखी एक धक्का!