हेच का अच्छे दिन? संजय राऊत यांनी नाव न घेता कुणावर साधला निशाणा?

| Updated on: Nov 20, 2023 | 6:48 PM

तुमच्याकडे राज्यात ईडी, सीबीआय असेल तर आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. तर आमच्याकडे मकाऊमधील २७ फोटो आणि ५ व्हिडीओ असल्याचा संजय राऊत यांचा इशारा

मुंबई, २० नोव्हेंबर २०२३ : भाजप आणि ठाकरे गटात सुरू असलेल्या ट्वीटर वॉर वरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर नाव न घेता टीका केली आहे. मकाऊमध्ये जाऊन राज्यातील माणूस साडे तीन कोटी उडवतो म्हणजे अच्छे दिन? असा सवाल संजय राऊत यांनी केला. तर तुमच्याकडे राज्यात ईडी, सीबीआय असेल तर आमच्याकडे मकाऊमध्ये ईडी आणि सीबीआय असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला. तर आमच्याकडे मकाऊमधील २७ फोटो आणि ५ व्हिडीओ असल्याचा इशारा संजय राऊत यांनी विरोधकांना दिलाय. तर महाराष्ट्रात दुष्काळाची परिस्थिती असताना मकाऊमध्ये ३ तासात ३.५ कोटी खर्च केल्याचा दावाही संजय राऊत यांनी केलाय. बघा काय म्हणाले संजय राऊत??

Published on: Nov 20, 2023 06:48 PM