एकनाथ शिंदे वेश बदलून काँग्रेसच्या बड्या नेत्याला भेटायचे, संजय राऊत यांचा सर्वात मोठा दावा
पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे अहमद पटेलांची भेट घ्यायचे, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे.
काँग्रेस सरकार असतानाही एकनाथ शिंदे वेश बदलून भेटीगाठी घ्यायचे, असं वक्तव्य ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी केलं. तर पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदे अहमद पटेलांची भेट घ्यायचे, अशी टीका संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केली. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर संजय राऊत यांनी टीका केल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी पलटवार केला आहे. संजय राऊत फरची टोपी घालून काश्मीरमध्ये राहुल गांधी यांना भेटले होते, असे संजय शिरसाट म्हणाले. तर शिळ्या कढीला उत आणण्याचं कारण नाही, असं उत्तर भाजपचे नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी राऊतांच्या टीकेवर उत्तर दिलं. बघा काय रंगतोय सत्ताधारी विरोधकांमध्ये वार-पटवार?
Published on: Jul 28, 2024 05:05 PM