संजय राऊत यांनी स्वतःची तुलना केली स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याशी? नेमकं काय म्हणाले बघा?
VIDEO | थुंकणं हा हिंदू संस्कृतीचा भाग, अन् स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देत संजय राऊत म्हणाले....
मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या थुंकण्याच्या कृतीनंतर एकनाथ शिंदे यांची शिवसेना चांगलीच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रश्नावर उत्तर देत असताना संजय राऊत यांनी आधी थुंकलं आणि त्यानंतर प्रतिक्रिया दिली. राऊतांच्या या कृतीमुळे संजय राऊत चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. तर याप्रकरणावर बोलताना राऊत म्हणाले, गद्दारांवर थुंकणं हा हिंदू संस्कृतीचा भाग आहे. इतकेच नाहीतर हे पटवून देताना त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा दाखला देखील दिल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी अप्रत्यक्षपणे स्वतःची तुलना वीर सावरकर यांच्याशी केली असता तुम्ही स्वतःची तुलना सावरकरांशी करत आहात का? असा प्रश्न केला असता ते म्हणाले, मी सावरकरांचा भक्त आहे. सावरकर, लोकमान्य टिळक, बाळासाहेब ठाकरे या सगळ्यांच्या चांगल्या गोष्टी आम्ही घेत असतो. चिड, संताप कोणत्याही प्रकारे व्यक्त होऊ शकते. तर मी कुठे थुंकलो मला दाखला, असा सवाल माध्यमांना करत मला दातांचा त्रास असल्याचे त्यांनी म्हटले.