अजितदादा आणि शरद पवार यांच्यावर संतापले संजय राऊत अन् गुप्त भेटीवर डाऊट !
VIDEO | महाविकास आघाडीचे शिलेदार विरूद्ध महाविकास आघाडीचे भीष्म पितामह, आमचा भाजपशी संबंध नाही असे वारंवार बोलून तुम्हीच संभ्रम निर्माण करताय, संजय राऊत यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांवर हल्लाबोल
मुंबई, १४ ऑगस्ट २०२३ | अजित पवार यांच्या गुप्त भेटीवर संजय राऊत हे शरद पवार यांच्यावर संतापले. संभ्रम निर्माण होईल असं भीष्मपितामह यांनी करू नये, आम्ही जर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चहा प्यायलो तर चालेल का? असा सवालही संजय राऊत यांनी केलाय. संजय राऊत यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना खडेबोल सुनावले. महाविकास आघाडीचे शिलेदार काका-पुतण्यांच्या गुप्त भेटीवरून भडकले. आमचा भाजपशी संबंध नाही असे वारंवार बोलून तुम्हीच संभ्रम निर्माण करताय, असं म्हणत संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलंय. अजित पवार यांच्या बंडामुळे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली आहे. तरीही गुप्तपणे शरद पवार आणि अजित पवार गुप्तपणे भेटताय. मग जनता आणि कार्यकर्त्यांच्या मनात शंका निर्माण व्हायला जागाय, असे म्हणत संजय राऊत सामनातूनही भडकल्याचे पाहायला मिळाले…बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…