शिंदे गटाने कायदा काय घरात नाचायला ठेवलाय का? संजय राऊत यांचा खोचक सवाल

| Updated on: Feb 24, 2023 | 1:19 PM

VIDEO | त्याच्यासाठी मिंधे गट रस्त्यावर उतरतो, महाराष्ट्राची संस्कृती बदलण्याचा हा प्रयत्न; संजय राऊत यांचा शिंदे गटावर निशाणा, काय म्हणाले राऊत बघा

नवी दिल्ली : एकनाथ शिंदे यांचे पुत्र डॉक्टर, खासदार श्रीकांत शिंदे यांनी संजय राऊतांच्या आरोपावर प्रत्युत्तर देताना त्यांनी तब्येची काळजी घ्यावी आणि त्यांना सिझोफ्रेनिया आजार झाल्याची खोचक टीका केली होती. यावर आज पुन्हा संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे ते म्हणाले, माझ्या माहितीप्रमाणे ते हाडाचे डॉक्टर आहेत. त्यांनी बरीच वर्ष प्रॅक्टिस केलेली नाही. या विषयावर न बोललेलं बरं. मी पोलिसांना माहिती दिली आहे. त्यांना अस्वस्थ व्हायचं कारण नाही. मोर्चेबिर्चे काढले जात आहेत. हे कायद्याचं राज्य असल्याचं लक्षण नाही, असे राऊत यांनी म्हटले आहे. तर सामन्य माणूस असेल किंवा लोकप्रतिनिधी असेल त्याच्या तक्रारीची चौकशी झाली पाहिजे. तक्रार केली म्हणून दहशतवाद होता कामा नये. जो आज होत आहे. कायदा काय तुमच्या घरात नाचायला ठेवला का?., असा खोचक सवालही संजय राऊत यांनी केला आहे.

Published on: Feb 24, 2023 01:19 PM
‘आगलावे’ तुमचं ‘संतुलन’… शिवसेना आमदाराचा संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्लाबोल
संजय राऊत यांनी अजित पवार यांचं केलं तोंडभरून कौतुक; म्हणाले, ‘दादा म्हणजे कमाल की चीज अन्…’