महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील दुर्दैवी घटनेवर संजय राऊत स्पष्टच म्हणाले, ‘श्री सदस्यांचा विचार न करता…’
VIDEO | महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यातील दुर्दैवी घटनेवरून संजय राऊत यांचा महाराष्ट्र सरकारवर घणाघात, बघा काय व्यक्त केला संताप
मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना पुरस्कार देण्यात आला. पण याच पुरस्कार सोहळ्यात दुर्दैवी घटना घडली आहे. यामध्ये 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये उष्माघातामुळे श्री सदस्यांचा मृत्यू झाला आहे. यावरून विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या सोहळ्यात घडलेल्या घटनेवरून हल्लाबोल केला आहे. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी आम्ही मानतो पण राजकीय कुरघोडी करण्यासाठी श्री सदस्यांना तासंतास बसून ठेवलं असा दावा संजय राऊत यांनी केला. संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा हा सायंकाळी ठेवता आला असता पण अमित शाह यांनी दुपारची वेळ दिली म्हणून तो कार्यक्रम घेतला होता. सहा तासाच्या वर श्री सदस्य बसून होते. त्यांचा कुठलाही विचार सरकारने केला नाही, फक्त व्यासपीठावर असलेल्या लोकांचा विचार केला असल्याचे स्पष्टपणे म्हणत या घटनेवर नाराजी व्यक्त केली.