VIDEO : शरद पवारांना खूर्ची देण्याच्या प्रसंगावरुन संजय राऊत भाजपला म्हणाले की, ही ### बंद करा

| Updated on: Dec 09, 2021 | 3:45 PM

अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती राजकारणात मतभेद असतील तरी हे सर्व लोक सार्वजनिक जीवनातील पितृतुल्य आहेत. ज्यांनी अडवाणींना आपल्यासमोर उभेही राहू दिले नाही, त्यांनी आम्हाला हे प्रश्न विचारू नये, असा टोलाही राऊत यांनी लगावला.

शरद पवारच काय तिथे लालकृष्ण अडवाणी असते तरी मी त्यांना खुर्ची दिली असती. पवारांचं वय, त्यांना होणारा त्रास या सर्व गोष्टी आहेत. आम्ही मांडी घालून बसतो. पवारांना वयोमानामुळे तसं बसता येत नाही. पायाचा त्रास आहे. अशावेळी पितृतुल्य व्यक्तीला खुर्ची दिली तर काय बिघडलं? हे जर कुणाला आवडलं नसेल तर ती विकृती आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी, लालूप्रसाद यादव, मुलायमसिंह यादवही आले असते आणि त्यांना असा त्रास असता तर त्यांनाही मी स्वत: खुर्ची दिली असती असे संजय राऊत म्हणाले.

VIDEO : Super Fast News | सुपरफास्ट 50 न्यूज | 2 PM | 9 December 2021
VIDEO : अखेर इंदापूर आगारातून धावली पहिली एसटी!