पक्ष, बाप, चोर आणि राजकारणाला आला जोर; संजय राऊत यांचे इंद्रिय निकामी, कुणाची खोचक टीका?

| Updated on: Jan 15, 2024 | 12:32 PM

कोणी दुसऱ्यांच्या बापाचा तर कुणी काकांचा पक्ष चोरला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार पलटवार केला आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधलाय.

मुंबई, १५ जानेवारी २०२४ : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदेंची शिवसेना आणि अजित पवार गटावर जोरदार निशाणा साधला आहे. कोणी दुसऱ्यांच्या बापाचा तर कुणी काकांचा पक्ष चोरला असा हल्लाबोल संजय राऊत यांनी केलाय. दरम्यान या टीकेवर सत्ताधाऱ्यांनीही जोरदार पलटवार केला आहे. इतकंच नाहीतर संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्यावरही निशाणा साधलाय. दिल्लीत बसलेल्या दोन बापांच्या जोरावर आणि निवडणूक आयोगाला ताब्यात घेऊन पक्ष चोरल्याचा आरोप संजय राऊत यांनी केलाय. तर संजय राऊत तणावग्रस्त आहेत. त्यांच्यावर कुठल्याही औषधांचा फरक पडणार नसल्याचा टोला खासदार श्रीकांत शिंदे यांनी लगावला आहे. आक्रमक पवित्रा घेऊन संजय राऊत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर बरसले. हिमंत असेल तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याचे थेट आव्हानच संजय राऊत यांनी दिलं आहे.

Published on: Jan 15, 2024 12:32 PM
लोकसभेचं बिगुल वाजलं, इनकमिंग सुरू? मिलिंद देवरा यांचा काँग्रेसला रामराम अन् शिवसेनेत प्रवेश
महायुतीचे राज्यभरात मेळावे, पण घटक पक्षांची नाराजी? वाट पाहू नाहीतर गेम करू… कुणाचा इशारा?