‘अशा फाऊद, दाऊद राऊतने मोदींवर बोलू नये’, देवेंद्र फडणीस यांचा हल्लाबोल

| Updated on: Apr 03, 2023 | 11:30 PM

VIDEO | बाजार बुनगे, राऊत, फाऊद, दाऊद म्हणत देवेंद्र फडणवीस यांची संजय राऊत यांच्यावर सडकून टीका

मुंबई : मुंबई येथील चारकोपमध्ये वीर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्या विरोधात केलेल्या अवमानास्पद वक्तव्याच्या विरोधात शिवसेना आणि भाजपकडून सावरकर गौरव यात्रा काढून प्रत्युत्तर देण्यास सुरूवात केली. आज मुंबईत सावरकर गौरव यात्रेतून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला, यावेळी जनतेला संबोधित करताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर पातळी सोडून टीका केली. यासह त्यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांवर टीका करतांना बाजार बुनगे, राऊत, फाऊद, दाऊद असे शब्द वापरून चांगलेच टीकास्त्र सोडले.

Published on: Apr 03, 2023 11:30 PM
Special Report | संजय शिरसाट यांच्या अडचणी वाढणार? ३ रूपयांचाच दावा का? अंधारे म्हणाल्या…
Special Report | संभाजीनगरच्या सभेला नाना पटोले गैरहजर अन् म्हणाले, माझ्यामुळेच इतरांची…