राज्यावर अस्मानी संकट पण सुलतान कुठे? मुख्यमंत्र्यांच्या प्रचार दौऱ्यावरून कुणाचा हल्लाबोल?

| Updated on: Nov 30, 2023 | 5:15 PM

राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने चांगलंच झोडपून काढलं आहे. या संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला

Follow us on

मुंबई, ३० नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपीटने चांगलंच झोडपून काढलं आहे. या संकटामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. राज्यात अवकाळी पावसाचं संकट आलं असताना सरकार जागेवर आहे का? असा सवाल करत सरकार पसार झाल्याची टीकाही त्यांनी केली. राज्यात अस्मानी संकट कोसळत असताना राज्याचे मुख्य सुलतान आणि डेप्युटी सुलतान प्रचारात व्यस्त आहेत. त्यांचं निवडणूक पर्यटन सुरू असल्याचा खोचक टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तर यावर भाजप नेते नितेश राणे यांनी पलटवार केलाय. ‘धर्मांतर ज्यांचं झालंय त्यांना लोकं सुलतानच वाटणार. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री प्रचाराला गेल्याने इतक्य़ा मिर्च्या झोंबताय.’