Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस यांना सध्या कंठ फुटलाय ते म्हणताय…., संजय राऊत यांनी का केला हल्लाबोल?
VIDEO | ललित पाटील प्रकरणावरून राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अशातच संजय राऊत यांनी हजारो कोटी रूपयांचं ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात कसं येतं? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे.
मुंबई, २४ ऑक्टोबर २०२३ | ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणावरून राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे. या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप केले जात आहे. अशातच संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हजारो कोटी रूपयांचं ड्रग्ज गुजरातमधून महाराष्ट्रात येतं कसं? असा सवाल करत देवेंद्र फडणवीस यांना सध्या फार कंठ फुटलाय. ते एका गरब्याला गेले. तिथे ते म्हणाले, देश का बच्चा बच्चा श्रीराम बोलेगा.. तो कधी बोलत नव्हता? जो बच्चा श्रीराम म्हणतोय, त्याच्यापर्यंत ड्रग्ज पोहोचतंय. त्याचा बंदोबस्त करा. पंचवटी रामाचंच ना? त्या नाशिकमधल्या पंचवटीत ड्रग्जचा सर्वात जास्त व्यापार चालू आहे. हे फडणवीसांना माहिती आहे का? पैठण तीर्थक्षेत्र आहे. तिथे काल अडीचशे-तीनशे कोटींचं ड्रग्ज सापडल्याचे संजय राऊत यांनी सांगितले तर ड्रग्सचा रावण आजूबाजूला फिरत आहे आणि तुम्ही श्रीराम बोलत आहात. त्या रावणाला संपवा त्यानंतर रामाचे नाव घ्या