Sanjay Raut : एकनाथ शिंदे बोला… गप्प का? हिंमत आहे का तुमची? संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांना थेट सवाल

| Updated on: Oct 14, 2023 | 1:11 PM

VIDEO | विश्वचषक सामन्यासाठी पाकिस्तानचा संघ गुजरातमधील अहमदाबादमध्ये दाखल झालाय, यावेळी पाकच्या संघाचं ग्रँड स्वागत करण्यात आलं, यावरून संजय राऊत यांनी शिवसेना भाजपवर निशाणा साधला आहे. इतकेच नाहीतर मुख्यमंत्री शिंदे यांना थेट सवाल करत सडकून टीका केली

मुंबई, १४ ऑक्टोबर २०२३ | भारत विरूद्ध पाकिस्तान असा विश्वचषक सामना आज गुजरात येथील अहमदाबाद येथे होणार आहे. या सामन्याकरता पाकिस्तानी संघ अहमदाबाद येथे दाखल झाला आहे. पाकच्या संघातील खेळाडूंचं यावेळी ग्रँड वेलकम करण्यात आल्याचे पाहायला मिळाले. यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजवर निशाणा साधला आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही हल्लाबोल केला आहे. पाकिस्तानच्या संघातील खेळाडूंचं भव्य स्वागत केलं जातं हे फक्त गुजरातमध्येच होऊ शकतं मोदी आणि शाह यांच्या राज्यातच होऊ शकतं. हे इतर कोणत्या राज्यात झालं असतं तर भाजपने कपडे काढून विरोध दर्शविला असता आणि देशभक्तीसह हिंदुत्वाचे धडे दिले असते. यावरूनच कळतंय गुजरात आणि राज्यातील सरकारने हिंदुत्व, देशभक्ती गुंडाळून ठेवलं आहे. आम्हाला लाज वाटते. आज बाळासाहेब असते तर यांना जोड्याने मारले असते. सरदार पटेल स्टेडियमचे नाव बदलून मोदी स्टेडियम केले. एकनाथ शिंदे बोला. तुमच्यात हिंमत आहे का? मी तुमचा धिक्कार करतो, असं राऊत म्हणाले.

Published on: Oct 14, 2023 01:11 PM
Sanjay Raut : एखाद्याला खून करण्याचं उत्तेजन द्यावं, असं विधानसभा अध्यक्षांचं काम, संजय राऊत यांचा घणाघात
Manoj Jarange Patil : तुमच्या हातात १० दिवस, जर मराठ्यांना आरक्षण नाही दिलं तर…, जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा