नारायण राणे यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर संजय राऊतांचा आक्षेप, थेट मानहानीची नोटीस पाठवली
संजय राऊतांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. पाहा...
शिवसेना ठाकरेगटाचे नेते संजय राऊत आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता थेट कोर्टापर्यंत पोहोचला आहे. संजय राऊतांनी नारायण राणे यांना मानहानीची नोटीस पाठवली आहे. बदनामीकारक वक्तव्य केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. एका भाषणानादरम्यान नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊत यांनी आक्षेप घेतला आहे. “संजय राऊत यांना मी खासदार केलं आहे. त्यांना निवडून आणण्यासाठी मी पैसे खर्च केले आहेत. संजय राऊत यांचं मतदार यादीत नावही नव्हतं”, असं नारायण राणे म्हणाले होते. या विधानावर राऊतांनी आक्षेप घेतलाय. राणेंना नोटीस पाठवली आहे.
Published on: Feb 03, 2023 09:31 AM