Sanjay Raut : ईडीचे अधिकारी एक दिवस पंडित नेहरुंच्या स्मारकाला नोटीस देतील, संजय राऊतांची टीका
सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणावर समन्स बजावल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत.
मुंबई : आज राष्ट्रीय राजकारणात एक मोठी बातमी चर्चेच्या केंद्रस्थानी होती. नॅशनल हेरॉल्ड केस (National Herald Case) प्रकरणी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (sonia Gandhi) आणि राहुल गांधी (rahul gandhi) यांना ईडीने नोटीस बजावली आहे. याप्रकरणी आता 8 जून रोजी ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान, यानंतर काँग्रेसन पत्रकार परिषद घेतली. काँग्रेस नेते अभिषेक मनु संघवी आणि रणदीप सुरजेवाला यांनी पत्रकार परिषद घेऊन ईडीने चौकशीला बोलावल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दिल्लीतील राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. सोनिया गांधी आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणावर समन्स बजावल्यानंतर अनेक राजकीय प्रतिक्रिया आल्या आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ‘सध्या भाजप विरोधात बोललं की कोणालाही ED ची नोटीस येते. सोनिया गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात नोटीस आली. आता केवळ नेहरूंच्या समाधीवर ईडीची नोटीस चिकटवणं बाकी आहे. हे ही दिवस बदलतील, असंही राऊत यावेळी म्हणालेत.