आज आनंद दिघे असते तर त्यांनी चाबकानं फोडलं असतं, संजय राऊत यांनी कुणाला फटकारलं?
'गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत. याच्यावर तमाम हिंदूंचा जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेणं हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे', संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
मुंबई, २९ नोव्हेंबर २०२३ : ठाकरे गटाचे नेते दत्ता दळवी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात अपशब्द वापरले म्हणून त्यांना त्यांच्या राहत्या घरातून पोलिसांनी अटक केली आहे. या अटकेनंतर ठाकरे गटाचे नेते, खासदार संजय राऊत यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेत आहेत. याच्यावर तमाम हिंदूंचा जनतेचा आक्षेप आहे. गद्दार हृदयसम्राट स्वतःला हिंदुहृदय सम्राट समजून घेणं हा वीर सावरकर, बाळासाहेब ठाकरेंचा अपमान आहे. त्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरच गुन्हा दाखल व्हायला हवा, असे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. जर आज आनंद दिघे असते तर त्यांनी गद्दार हृदयसम्राट यांना चाबकाने फोडून काढले असते, असं संजय राऊत यांनी म्हणत एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटावर निशाणा साधला आहे.
Published on: Nov 29, 2023 12:45 PM