Sanjay Raut : शिवसेनेकडून पुन्ह मुख्यमंत्र्यांवर टीकास्त्र, एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा, संजय राऊतांचा टोला
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ट्विट करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाहीच, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
मुंबई: आज गुरुपौर्णिमा आहे. त्यानिमित्त शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘बाळासाहेब हे गुरू होते, तसेच त्यांच्यात गुरुर होता. त्यांच्यात ब्रह्मा, विष्णू, महेश होते. ते आमचे तेजस्वी नेते होते. त्यांनी आम्हाला सावरलं. देश आणि महाराष्ट्र त्यांना गुरुस्थानी मानतो. एकनिष्ठेने शिवसैनिक बाळासाहेबांसोबत आहेत. एकनिष्ठा हीच गुरुदक्षिणा असते. आम्ही या उपकाराखाली नेहमी राहू, असं संजय राऊत म्हणालेत. गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मुख्यमंत्री (CM) एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ट्विट करून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केलं आहे. बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा नाहीच, असं एकनाथ शिंदे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. त्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. यामुळे आता पुन्हा एकदा संघर्ष वाढल्याचं दिसतंय.